3 May 2025 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
x

होय, महाविकास आघाडीतील काही नेते अस्वस्थ आहेत, पवारांच्या विधानाने खळबळ

Sharad Pawar. CM Uddhav Thackeray, MahaVikas Aghadi

मुंबई, २८ जुलै : शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगळ्या लढू अशी भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली, मात्र या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. सरकार महाविकास आघाडीचं असलं तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी स्टेअरिंग पकडलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे’ असं म्हणून गुगली टाकली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत असताना शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. तसंच महाविकास आघाडीबद्दल भाष्यही केले. ‘सध्या नवीन पर्याय नसल्याने हे सरकार 5 वर्ष चालणार आहे. पण भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांना सरकार पाडण्याची घाई आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक कोणालाही नको आहे’ असं म्हणत पवारांना फडणवीसांना टोला लगावला आहे.

‘धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहे. प्रशासन घेत नाही. विशेषतः सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे’ असंही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून मुख्यमंत्री मातोश्रीवरच असता अशी टीका होत आहे. त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

तसेच काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये नाराजी आणि अस्वस्थता असते. राज्य चालवताना काही इच्छा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अस्वस्थता वाढते. सध्या नवीन पर्याय नसल्यानं हे सरकार ५ वर्षे चालेल, सध्याची परिस्थिती पाहता कोणालाही निवडणूक नको आहे असंही शरद पवार यांनी सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याची कबुलीच दिली आहे.

 

News English Summary: NCP president Sharad Pawar himself has confirmed I don’t have the remote of the Mahavikas Aghadi government, some leaders are upset’. He has also expressed displeasure over the administration of Uddhav Thackeray.

News English Title: Sharad Pawar on Uddhav Thackeray administration; Mahavikas Aghadi leader confesses to being upset News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या