मुंबई: शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्यावर एका महिला सहकारी महिलेने लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आरसीएफ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अद्याप अटक झाली नसल्याचे वृत्त आहे.

सदर प्रकरणाशी संबधित अधिकाऱ्याने क्राईम रिपोर्टरला माहिती देताना सांगितले की, ज्या महिलेने महेश्वरी यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे ती महिला स्वतः शिव वाहतूक सेनेची सदस्य आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला वारंवार मानसिक त्रास दिला आणि तिचा लैंगिक छळ करत अनेकदा शारीरिक सुखाची मागणी करण्याचा सपाटा लावला होता. आपल्या तक्रारीत महिलेने असा आरोप केला आहे की माहेश्वरी तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा आणि आणि लैंगिक छळाबद्दल कोठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.

शुक्रवारी मुंबईतील आरसीएफ पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीरपणे एफआयआर नोंदविल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला. माहेश्वरीविरोधात कलम 354 A and 354 D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश्वरी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे पाली हिल निवासस्थानी भेट दिली होती.

माहेश्वरी हे शिवसेनेच्या परिवहन शाखेचे प्रमुख आहेत. २०१५ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली, शिव वाहक सेना महाराष्ट्रातील सर्वात मोठी कामगार संघटना असल्याचा दावा करण्यात आला असून त्यात तब्बल ५.५ लाख सदस्य आहेत. दरम्यान, दीपक महेश्वरी यांनी आता त्याला पळवाट म्हणून हे आपल्याच लोकांना हाताशी धरून षडयंत्र रचलं जात असल्याचा प्रचार त्यांच्या समर्थकांनी सुरु केला आहे. विशेष म्हणजे इतरांना शिव वाहतूक सेनेची प्रगती खुपत असल्यानं हे केलं जातं असल्याचा हास्यास्पद प्रचार ते सध्या करत असून तशा पोस्ट देखील समाज माध्यमांवर टाकत आहेत.

 

शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरींवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; महिला शिववाहूक सेनेची सदस्य