2 May 2025 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Jan Ashirwad Yatra | आगरी-कोळी पट्ट्यात शिवसेनेकडून कपिल पाटील यांचं स्वागत | भाजपची क्रॉस पॉलिटिक्सने कोंडी

union minister Kapil Patil

बदलापूर, १९ ऑगस्ट | केंद्रीय मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री जात आहेत, तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. बदलापूरच्या घोरपडे चौकात भाजपनं कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला.

विरोधापेक्षा क्रॉस पॉलिटिक्स (Shivsena Badlapur leader Waman Mhatre and union minister Kapil Patil during BJP Jan Ashirwad Yatra) :

याबाबत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना विचारलं असता, आपल्या स्थानिक खासदारांची केंद्रात मंत्री म्हणून निवड होणं, ही शहरासाठी आनंदाची बाब असून एखाद्या वरिष्ठांचं स्वागत करणं, शहरात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं ही शिवसेनेची आणि बाळासाहेबांची शिकवण असल्याचं वामन म्हात्रे म्हणाले. वास्तविक कोळी आणि आगरी समाजाच्या पट्ट्यात शिवसेना भाजप विरोधात क्रॉस पॉलिटिक्स खेळत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढतेय असंच म्हणावं लागेल.

कपिल पाटील हे युतीचे खासदार म्हणून निवडून गेले: वामन म्हात्रे
म्हात्रे यांनी स्वागत करताना कपिल पाटील हे युतीचे खासदार म्हणून निवडून गेले असून त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून झालेली निवड ही बदलापूर शहरातल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा आनंदाची बाब असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण त्यांना बदलापूर शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी केली असून कपिल पाटील यांनीही विकासकामांना गती देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं वामन म्हात्रे यांनी सांगितलं. त्यामुळे भविष्यात विकास कामांवरून भाजपाला कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेनेने केल्याचं पाहायला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena Badlapur leader Waman Mhatre homage union minister Kapil Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या