24 April 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे | आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Dasara Melava 2020, BJP Party

मुंबई, २५ ऑक्टोबर: करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असंही विचारलं जातं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, करोना नसता तर शिवतिर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच.

दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना, आगामी महापालिका निवडणुकांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत खासदार राऊत यांनी केलंय. अनेकजण म्हटले होते की, 11 दिवसांत सरकार पडेल. गणपतीला सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे, आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील, असे म्हणत भाजपाला इशारा दिला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्र असेल, असे भाकीत राऊत यांनी केलंय.

 

News English Summary: Speaking on the occasion of Dussehra, Sanjay Raut also commented on the upcoming municipal elections. The upcoming municipal elections will also be fought under the leadership of Mahavikas Aghadi. MP Raut has predicted that Shiv Sena will once again come to power in the Municipal Corporation. Many had said that the government would fall in 11 days. Ganpati will be immersed in the government, but now Dussehra has come. We have all the preparations, now bombs will explode under them, he warned the BJP.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut indirect message to BJP before Dasara Melava 2020 News updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x