3 May 2025 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

जोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मी राज्यपालांवर टीका करणारच

Shivsena ,MP Sanjay Raut, Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई, २८ मार्च: मागील काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले, असे रोखठोक मत शिवसेनेनं मांडले. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून राज्यातील राजकीय घडामोडींवर विस्तृत भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. त्यामुळे फाटक्या फुग्यात हवा भरण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटतात. नंतर ते खोटे ठरतात. पण अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळ्यात आधी जावे लागेल असं राऊतांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यपालांना लक्ष करताना राऊतांनी म्हटलं आहे की, “राज्य सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवून सहा महिने झाले, पण राज्यपाल कोश्यारी हे ठाकरे सरकार जायची वाट पाहत आहेत. हा घटनात्मक भंग आहे, असं गणित राऊत यांनी मांडलय. राऊत यांच्याकडून सातत्याने 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना प्रश्न विचारण्यात येतो. विशेष म्हणजे जोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मी राज्यपालांवर टीका करणारच”, असे देखील राऊत यांनी यापूर्वीच म्हटलंय.

 

News English Summary: It has been six months since the state government sent a list of 12 governor-appointed MLAs to the governor, but Governor Bhagat Singh Koshyari is waiting for the Thackeray government to leave. This is a constitutional violation, said Ganit Raut. Sanjay Raut has consistently questioned the governor over the appointment of 12 MLAs. “Unless 12 MLAs are appointed, I will criticise the governor,” Raut had earlier said.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut talked on 12 governor appointed MLAs news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या