26 January 2022 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

जनाशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण | भाजपवर टीकास्त्र

Shivsena

मुंबई, १८ ऑगस्ट | केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जाणयात्रेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न:
केंद्रीय मंत्र्यांची जनयात्रा सुरु असल्याने त्यावर आता विरोधी पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसन काम करतात म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केल्या आहेत. एका सर्व्हेत मध्ये सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्रयांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव आहे, तर भाजच्या एकही मुख्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश नाही आहे. यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येतं का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे, असं सांगतानाच त्याकाळात प्रत्येकाना वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात कारण नसताना, त्याला आम्ही काय करणार, असा हल्लाही त्यांनी चढवला आहे.

उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉप टेन आणि टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. आता ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील. आमचे राजकीय विरोधक काहीही म्हणून द्या. ते म्हणतील हा कसला पोल? असा पोल असतो का? ते काहीही म्हणून द्या. जेव्हा तुमच्याबाबतीत पोल येत होते, तेव्हा तुम्ही त्याचे ढोल आणि झांजा वाजवत होता. आता आम्हीही फटाके फोडू. आमचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि गर्व वाटावं असं नेतृत्व आहे. त्यांचं काम उत्तम चालू आहे. विकासाचं आणि कोरोना नियंत्रणाचं काम चांगलं चालू आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena slams BJP over Jan Ashirwad Yatra news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x