3 June 2020 2:59 PM
अँप डाउनलोड

औरंगाबाद: मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता

Former MLA Harshvardhan Jadhav, Aurangabad, Atrocity

औरंगाबाद : औरंगाबादच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत असणारं आणि दबदबा असणारं नाव म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. ऍट्रॉसिटी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. सध्या ते त्यांच्या निवासस्थानी नसल्याचं कळत असून, त्यांचा शोधही घेतला जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं होतं.

त्यावेळी हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे यांनी देखील मनसेत प्रवेश केला होता. मनसेने भगव्या हिंदुत्वाचा राजकीय मार्ग स्वीकारल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतील नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यात मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यात २-३ महिन्यावर आलेल्या औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता, ते शिवसेनेचे नांदेडमधील प्रमुख पदाधिकारी होते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना तब्बल ३ लाखाच्या आसपास मतं मिळाली होती आणि मराठा समाज त्यांच्या केंद्रस्थानी होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर आता औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

 

News English Summery: Former MLA Harshvardhan Jadhav is likely to be arrested for being a controversial name in Aurangabad’s political circle. They have been charged in the Atrocity case. Jadhav’s anticipatory bail was overturned and he could be prosecuted at any moment. He has been charged with abduction of a shopkeeper. At present, Jadhav does not know that he is at his residence and he is being searched.

 

Web News Title: Story Aurangabad Politics former MLA Harshvardhan Jadhav booked for Atrocity will have arrest any time.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(629)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x