आमदारांना वाहनासाठी बिनव्याजी ३० लाख; तेच स्टार्टअप'ला दिल्यास? सविस्तर वृत्त

मुंबई, १५ मार्च : आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ, वाहनचालकांना दरमहा १५ हजारांचे वेतन यापाठोपाठ आमदारांना वाहन खरेदीकरिता ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदार मंडळींना खूश केले. यासाठी सरकारने दिलेली मूळ रक्कम आमदाराला फेडावी लागणार आहे. त्यावरील व्याज सरकार भरेल, अशी घोषणा करताच सभागृहात आमदारांनी त्यांचे बाके वाजवून स्वागत केले.
विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषणावर नोंदवलेल्या आक्षेपांना अजित पवारांनी विधानसभेत उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी आमदारांच्या वाहनासाठी सरकार मदत करणार असल्याची घोषणा केली. आमदारांना गाडी खरेदी करण्यासाठी सध्या १० लाख रुपये कर्जाऊ मिळतात. ही रक्कम आता ३० रुपये करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी जाहीर केलं. ज्या आमदारांची आर्थिक परिस्थिती चांगली असते, त्यांना १० लाखांमध्ये गाडी घेणं शक्य होतं. मात्र, काही आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी नवीन गाडी घेणं कठीण होत असल्यामुळे हा निधी १० लाखांवरून ३० लाख करण्याचा निर्णय घेतल्याचं ते पुढे म्हणाले.
वास्तविक, ही तीच नेतेमंडळी आहेत ज्यांनी निवडणुकीत रोजगाराचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत तरुणांच्या विकासासाठी हे सरकार काम करेल असं सांगणारे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ स्वपक्षातील आणि विरोधातील आमदार स्वतःकडे कसे आकर्षित करता येतील यासाठीच काम करताना दिसत आहेत. त्यांना खरंच तरुणांच्या रोजगाराची इतकी काळजी असली असती तर, त्यांनी अशा बिनव्याजी कर्जाची योजना नव्या स्टार्टअप’साठी आणली असती आणि त्यातून केवळ व्यवसायिक नव्हे तर रोजगार देणारे तरुण देखील निर्माण केले असते.
आज अनेक तरुणांकडे उद्योगांच्या नवनवीन कल्पना आहेत, मात्र त्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य मिळण्याचा कोणताही सरकारी उपक्रम नाही. अगदी मुद्दल परत करण्यास देखील अशा तरुणांची काहीच हरकत नसेल आणि ज्याप्रमाणे आमदारांना वाहनांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे, अगदी तशाच स्वरूपाचं कर्ज उद्योगाच्या नव्या संकल्पना असणाऱ्या तरुणांना राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्यास एक मोठ विश्व ते तरुण उभं करून देऊ शकतात. अगदी प्रायोगिक तत्वावर सरकारने असे उपक्रम हाती घेण्याची गरज असताना, अर्थमंत्रालय केवळ आमदार आणि मंत्रिमंडळाच्या सोयी सुविधांवर केंद्रित असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यकाळातील स्वयंरोजगार आणि त्यातून निर्माण होणार रोजगार याबाबत सरकारी पातळीवर किती जोरदार प्रयत्न सुरु आहेत याचा अंदाज येऊ लागला आहे.
News English Summery: Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar appealed to the MLAs, announcing an increase of Rs 1 crore in the MLA Fund, giving an interest free vehicle loan of Rs.30 Lakhs. But government don’t have any such scheme for news startups concept for producing more entrepreneurs and through that more employment in the state.
Web News Title: Story Maharashtra assembly MLA will get loan for vehicle without interest News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH