3 May 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

....त्यामुळे आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला - अनिल परब

Anil Parab, ST Bus Service

मुंबई, ११ मे : कोरोनाचा फ़ैलाव रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद रहाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. सुरुवातील ग्रीन झोन संदर्भातील विचार होणार असून रेड झोन संदर्भात सध्या विचार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मुंबई, पुण्यातून लवकर एसटी सेवा सुरु होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.

“जे परराज्यातील लोक आहेत त्यांना आपल्या राज्याच्या सीमेवर आणि परराज्यातून आपल्या सीमेवर आलेल्यांना तसंच आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मोफत एसटी सेवा देऊ असं आम्ही जाहीर केलं होतं. माहिती घेण्यास सुरुवात केली असता रेड झोनमधून बाकीच्या जिल्ह्यात माणसं पाठवू नका, तिथे करोना पसरवू नका अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळेच आम्ही आंतरजिल्ह्याचा निर्णय थांबवला,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोध झाला. मुंबईतून कोरोना आमच्या गावात येईल यासाठी विरोध झाला. त्यामुळे निर्णय बदलल्याचे परब यावेळी म्हणाले. गावकऱ्यांचा विरोध झाल्यास संबधित जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे एसटी वाहतूक टप्प्याटप्याने सुरू करण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली. यासदंर्भात आंतरजिल्हा बाबत बैठक होणार आहे. एसटी स्टॅन्डवर जाण्याची घोषणा आम्ही केली नव्हती. एसटी स्टॅण्डवर गर्दी करु नका, सरपंच आणि पोलीसांशी संपर्कात राहा असे अवाहन देखील परब यांनी यावेळी केले.

 

News English Summary: Transport Minister Anil Parab has informed that inter-district ST traffic will be closed for the time being to prevent the spread of corona. This transport will be started in phases. Parab said the decision had to be taken after protests erupted from the red zone not to leave people in our district.

News English Title: Story Maharashtra inter district ST Bus transportation remained closed says minister Anil Parab News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या