ती व्यक्ती COVID १९ पॉझिटिव्ह तरी अजून घरीच; आ. राजू पाटील यांचा सतर्कतेचा इशारा

डोंबिवली, ३१ मार्च: दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज २३० वर पोहचली असून यातील १२२ रुग्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील असल्याने या दोन्ही महानगरांमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, ठाण्यानंतर पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत करोनाचे ४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सांगलीत करोनाचे २५, नागपूरमध्ये १७, अहमदनगरमध्ये ५, रत्नागिरीत १, औरंगाबादमध्ये १, यवतमाळमध्ये ३, साताऱ्यात १, सिंधुदुर्गात १, कोल्हापुरात २, जळगावात १, बुलडाण्यात ३ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्राची आणि मुंबईची चिंता वाढवणारी काही प्रकरणं आता हळहळू समोर येऊ लागली आहेत. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनाचा शिरकाव झाला नसल्याच्या दाव्याला छेद देणाऱ्या घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. या घटनांतून करोनानं धोकायदायक ठरणाऱ्या कम्यनिटी ट्रान्समिशनमध्येही चंचुप्रवेश केला असल्याचंच दिसत आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून एक डोंबिवलीतील चिंता वाढवणारी आणि धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “डोंबिवली रिजन्सी येथे आज दुपारी ३ वा. COVID १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. महापालिका अजूनपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करू शकली नसल्याने रुग्ण त्याच्या घरीच आहे. येथे रोज नवीन रूग्ण सापडत असताना हीच तयारी असेल तर कठिण आहे” असं सांगत प्रशासनाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.
डोंबिवली रिजन्सी येथे आज दुपारी ३ वा. #covid19 positive रुग्ण आढळून आला आहे. महापालिका अजूनपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करू शकली नसल्याने रुग्ण त्याच्या घरीच आहे. येथे रोज नवीन रूग्ण सापडत असताना हीच तयारी असेल तर कठिण आहे.@CMOMaharashtra @rajeshtope11 @mieknathshinde @KDMCOfficial
— Raju Patil (@rajupatilmanase) March 31, 2020
News English Summary: Some of the issues that have raised concerns about Maharashtra and Mumbai are now slowly coming to the fore. In the past few days there have been incidents that have pierced the claim that the corona was not breached by community transmission in the state. Experts say the coroner has also been involved in community transmissions that have been dangerous. Meanwhile, MNS MLA Raju Patil tweeted, giving a disturbing and shocking information in Dombivali. He tweeted, “At 3 pm COVID 19 positive patient was found at Dombivali Regency this afternoon. The municipality has not been able to provide ambulance yet. The patient is at his home. It is difficult to prepare if new patients are being found here daily.” Attempts have been made to alert the administration.
News English Title: Story MNS MLA Raju Patil gave alert to State Govt regarding Covid 19 positive patient at Dombivali News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER