26 July 2021 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

कोरोना आपत्ती | पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय - उपमुख्यमंत्री

Maharashtra corona pandemic

पुणे, ०७ मे | लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतात तयार झालेल्या कोरोना लसी बाहेरच्या देशांना अगोदर द्यायला नको होत्या. रशियाने त्यांचं झाल्यावर लस दिली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. इतकंच नाही तर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनवाला यांना फोन लावला होता, ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाहीत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या जास्त दिसत आहे. पुण्यात रुग्ण थोडे कमी झाले आहेत. हायकोर्टाने सरकारला पुण्यात कडक लॉकडाउन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. मला त्यासंदर्भात बोलायचं नाही,” सांगत अजित पवारांनी भाष्य करण्यास नकार दिला. हायकोर्टाच्या सूचनेसंबंधी राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं ते म्हणाले.

 

News English Summary: The risk of corona is increasing in young children. Therefore, a hospital for children has been reserved in Pune. Not only that, those who have been given the first dose of Corona should be given the second dose, said Deputy Chief Minister Ajit Pawar. He was speaking in Pune.

News English Title: The hospital for children has been reserved in Pune said deputy CM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x