13 May 2025 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL CDSL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: CDSL Alok Industries Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, हा पेनी स्टॉक देईल मजबूत परतावा - NSE: ALOKINDS
x

शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते | की शिवसेना फरफटत येणारच...पण

Shivsena, granted, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३ डिसेंबर: राज्यातल्या महाविकास आघाडीला (State MahaVikas Aghadi Government) एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज ‘महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. माझा सहकाऱ्यांवर विश्वास असून त्यांचे फोन टॅपिंग करण्याची मला गरज नाही असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, लोक माझ्यावर टीका करतात की मी घराबाहेर पडत नाही म्हणून, परंतु माझ्या सहकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सहकारी म्हणायचं आणि त्यांचे फोन टॅपिंग करायचे याची मला गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, ‘महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही’, या पुस्तिकेचे प्रकाशन (Maharshtra Thambala Nahi, Maharashtra Thambanar Nahi publication of this booklet) राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही. जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. मात्र या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, असं उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले.

“मागील वर्षभरात जे आमचं टीमवर्क झालं (MahaVikas Aghadi Government Team Work) आहे. ते पाहिल्यानंतर हे सर्व माझे सहकारी त्यात सर्व अनुभवी आहेत. अनुभव नसणारे कोणी नसतील असं त्यांच्या कामावरुन वाटतंच नाही. सगळेच जण फार छान काम करत आहेत. वर्षभरापूर्वी अनेकांना असं वाटतं होतं की हे सरकार अस्तित्वाच येऊच शकत नाही. शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते. की शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं.

 

News English Summary: On the occasion of the completion of one year of the State MahaVikas Aghadi Government, ‘Maharshtra Thambala Nahi, Maharashtra Thambanar Nahi booklet was published. Chief Minister Uddhav Thackeray, NCP President Sharad Pawar, Deputy Chief Minister Ajit Pawar and Balasaheb Thorat were present at the function held at Sahyadri Guest House. In his short speech, Chief Minister Uddhav Thackeray made a strong statement. “I trust my colleagues and I don’t need to tap their phones,” he said.

News English Title: They took Shivsena granted but Shivsena not party faltering said CM Uddhav Thackeray News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या