30 June 2022 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

नागपुर | पिकनिकला गेले आणि संपूर्ण कुटुंब पुराच्या पाण्यातच अडकलं | प्रशासनाची रात्रभर धावपळ

Nagpur Flood

नागपूर, २३ जून | सध्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नदी-नाले-धबधबे ओसांडून वाहत आहे. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण जात आहेत. पण नागपुरमधील एका कुटुंबाला पिकनिक चांगलीच महागात पडली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील घोघरा धबधब्याजवळ ही कुटुंब तब्बल आठ तास पुराच्या पाण्यात आडकले. मंगळवारी रात्री 11 वाजता सर्वांना सुरक्षित वाचवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमधील गुर्जर कुटुंब छिंतवाडामधील घोघरा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी पाणी कमी असल्यामुळे हे कुटुंबिय धबधब्यातील एका बेटावर गेले. पण, तीन वाजेच्या नंतर अचानक पाण्याची पातळी वाढली आणि मोठा पूर आला. पुरामुळे या कुटुंबाला बाहेर येता आले नाही. अखेर तेथील काही लोकांनी पोलिसांना घटनेची सूचना दिली.

पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. पाण्याचा प्रवास आणि अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. पण, अखेर मोठ्या मुश्किलीने रात्री 11 वाजता 12 जणांना वाचवण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Twelve people including 2 children from Nagpur trapped in the flood in Chindwada rescued news updates.

हॅशटॅग्स

#Nagpur(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x