9 May 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरेंचं मत

Hitlerism in India, Marathi Sahitya Sammelan, Aruna Dhere

उस्मानाबाद: ‘जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,’ असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं.

“साहित्य आणि समाज यामधल्या बदलांबाबत ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे फारसं काही बोलले नाहीत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिब्रेटो यांनी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्यांचा विषय त्यांनी भाषणात घेतला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते निरनिराळ्या विषयांवर ते तळमळीने बोलले. ती तळमळ खरी होती.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं असा सवाल फ्रान्सिस दिब्रेटो यांनी उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर यांना ठार करण्यात येतं ही कोणती भारतीय संस्कृती असल्याचे सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असं म्हणत त्यांनी याबाबतची खंतही फ्रान्सिस दिब्रेटो यांनी व्यक्त केली होती.

 

Web Title:  Writer and former Marathi Sahitya Sammelan Chief Aruna Dhere mentioned her opinion on Hitlerism India.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या