 
						Achyut Healthcare Share Price | शेअर बाजारातील स्मार्ट गुंतवणुकदार बोनस वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे लावून ही मजबूत नफा कमावतात. सध्या जे तुझी बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी एप्रिल महिन्यात एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 63.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Achyut Healthcare Limited)
‘अच्युत हेल्थकेअर’ बोनस डिटेल :
‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनीने सेबीला बोनस शेअर्सची माहिती देताच शेअर रॉकेटसारखा उडू लागला. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनीने आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 शेअर बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर बोनस देईल. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनीने या बोनस इश्यूसाठी 24 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट जाहीर केला आहे. म्हणजेच 25 एप्रिल 2023 रोजी पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर देईल.
स्टॉकची मागणी वाढली :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त एका वर्षात 219.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे मागील सहा महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 120.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 63.94 रुपये आहे. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 57.86 रुपये होती. या कंपनीचा IPO 12 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता.
अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा IPO गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO साठी कंपनीने 20 रुपये प्राइस बैंड निश्चित केला होता. मात्र या IPO ला गुंतवणूकदारांनी फारसा चांगला प्रतिसाद दिला नाही. परंतु असे असूनही कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		