 
						Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्म तर्फे अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने अदानी समुहाला क्लीन चिट दिली आहे. मागील 3 दिवसांत अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 40 टक्के पर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समधील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे.
अदानी समूहातील 10 कंपन्याच्या बाजारमूल्य
मागील 3 दिवसांत अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 180000 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. म्हणजेच अदानी समूहातील 10 कंपन्याच्या शेअर्सचे बाजारमूल्य 180000 लाख कोटी रुपये म्हणजेच 22 अब्ज डॉलर्सने वाढले आहे.
अदानी एंटरप्रायझेस शेअर्स
अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 40 टक्के मजबूत झाले आहेत. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स गुरुवारच्या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या कालावधीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 76000 कोटी रुपयेची भर पडली आहे.
अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स
त्याच वेळी अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवालापूर्वीच्या किंमत पातळीवर पोहोचले आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीच्या बाजार भांडवलात अवघ्या 3 दिवसात 25000 कोटीची पडली आहे.
अदानी पॉवर शेअर्स
अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 96 टक्क्यांनी वाढले आहे. तर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 96 टक्के मजबूत झाले आहे. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवाल येण्यापूर्वी ज्या पातळीवर होते त्या किमतीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
अदानी टोटल गॅस शेअर्स
हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर जे आरोप करण्यात आले होते, त्याचा सर्वाधिक फटका अदानी टोटल गॅस कंपनीला बसला होता. या कंपनीचे शेअर्स आता नीचांक किमतीवरून 20 टक्के मजबूत झाले आहे. अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी 414 टक्के वाढ झाली तर, शेअरची किंमत हिंडनबर्गच्या अहवालापूर्वीच्या पातळीवर पोहोचतील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		