
Adani Wilmar Share Price | मागील काही महिन्यांपासून अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील वर्षी तेजीत धावणारा हा स्टॉक हिंडनबर्ग फर्मच्या वादग्रस्त अहवालानंतर जबरदस्त कोसळला होता. त्यातून अजूनही हा स्टॉक पूर्णतः सावरला नाहीये. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 355.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावासह क्लोज झाला आहे. नुकताच कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक तज्ञ या कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी विल्मर स्टॉक 0.21 टक्के घसरणीसह 350.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ब्रोकरेज फर्म नुवामाने अदानी विल्मार स्टॉकबाबत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 480 रुपये किमतीवर जाऊ शकतो. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 18 टक्क्यांच्या घसरणीसह 200.89 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत अदानी विल्मर कंपनीने 246.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी अदानी विल्मर कंपनीने 15,515.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 12,887.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. अदानी विल्मर ही कंपनी फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत खाद्यतेल आणि इतर अनेक खाद्यपदार्थ बनवण्याचा व्यवसाय करते.
अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “स्वच्छ आणि दर्जेदार खाद्य पदार्थांबाबत ग्राहकांच्या पसंतींमध्ये बदल झाल्यामुळे कंपनीने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. अन्न आणि FMCG विभागातून कंपनीला 5000 कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे”. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा खाद्यतेल विभागातील खंड वार्षिक आधारावर स्थिर राहिला होता. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत त्यात आठ टक्के वाढ नोंदवली गेली होती.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 355.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 355.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 509.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 285.85 रुपये होती. मागील एका वर्षात अदानी विल्मर स्टॉक 20 टक्के घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,963.13 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.