
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीच्या शेअरने एका महिन्यात गुणतवणूकदारांना ५३ टक्के परतावा दिला आहे. मंगळवारी हा शेअर 4.65 टक्क्यांनी घसरून 144.25 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 4,421 कोटी रुपायी आहे.
प्रोग्रेसिव्ह शेअर्स ब्रोकरेज फर्मने या स्टॉकबाबत सांगितले की, ‘या डिफेन्स कंपनी शेअरने फॉलिंग वेज फॉर्मेशनमधून ब्रेकआऊट दिला आहे. परंतु, अलीकडे अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली असली तरी मागील ६ महिन्यात या शेअरने 26.34% परतावा दिला आहे.
अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअरमध्ये ब्रेकआऊटमुळे तेजी कायम राहण्याचा पाया रचला गेला आहे. तांत्रिक आणि मूलभूत ताकद लक्षात घेता अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर शॉर्ट टर्ममध्ये १७५ ते १८६ रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र, या डिफेन्स कंपनी शेअरबाबत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण शेअर १२० रुपयांच्या खाली घसरल्यास सकारात्मक दृष्टीकोन बदलू शकतो असं स्टॉक मार्केट तज्ज्ञ रणदिवे म्हणाले.
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट विश्लेषक ए. आर. रामचंद्रन म्हणाले की, ‘अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर डेली चार्टवर मंदीची संकेत दिसत आहेत. शेअर १४१ रुपयांच्या सपोर्ट खाली गेल्यास पुढे हा तो ११८ रुपयांपर्यंत घसरू शकतो असं ए. आर. रामचंद्रन म्हणाले.
अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा 1 आहे, जो या कालावधीत सरासरी अस्थिरतेचे संकेत दर्शवितो. टेक्निकल चार्टनुसार, अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजे आरएसआय 74.1 आहे, जो संकेत देतो की शेअर ओव्हरबायड किंवा ओव्हरट्रेडिंग झोनमध्ये ट्रेड करत नाही. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी शेअर 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 3-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त ट्रेड करत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.