15 December 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअर्स सलग अप्पर सर्किटमध्ये, अत्यंत स्वस्त झालेल्या स्टॉकमध्ये खरेदी वाढतेय

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांची कंपनी ‘रिलायन्स कॅपिटल’चे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर.अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. NCLAT च्या आदेशानंतर शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारी NCLAT ) ने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या रिझोल्यूशन प्रकरणात कर्जदारांच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीची याचिका स्वीकारली. कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)

संपूर्ण प्रकरण समजून घ्या :
NCLAT ने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT चा आदेश बाजूला सारून कमिटी ऑफ क्रेडिटर्सला उच्च बोली लावण्याचा अधिकार आहे, असा आदेश दिला. अपीलीय न्यायाधिकरणाने CoC ला आव्हान यंत्रणा सुरू ठेवण्याची आणि दोन आठवड्यांनंतर निकामीसाठी बोली आमंत्रित करण्याची परवानगी दिली. NCLAT ने Vistara ITCL India Ltd प्रकरणात हा आदेश जाहीर केला आहे. अनिल अंबानीच्या कंपनीला कर्ज देणाऱ्यांमध्ये विस्तारा आयटीसीएल देखील सामील आहे. दिवाळखोर कंपनीच्या पुढील लिलावाला स्थगिती देणाऱ्या एनसीएलटीच्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते.

रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या बाबतीत ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ ग्रुपने सर्वाधिक म्हणजेच 8,640 कोटी रुपयांची बोली सादर केली आहे. तथापि कंपनीच्या कर्जदारांच्या समितीने दुसरी निलामी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिंदुजा समूहाच्या ‘इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स’ कंपनीने सुधारित बोली जाहीर केली. ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट’ फर्मने एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली, त्यावर NCLT ने 2 फेब्रुवारी 2023 रोजी सांगितले की 21 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या निलामीची आव्हान यंत्रणा पूर्ण झाली आहे. टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स फर्मने 9 जानेवारी 2023 रोजी नवीन याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये NCLT ट्रिब्युनलला नवीन लिलावासाठी कर्जदारांच्या योजनेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. नंतर IIHL ने NCLT च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. IIHL ने NCLT च्या आदेशाविरुद्ध NCLAT म्हणजेच अपीलीय न्यायाधिकरणाकडे अपील दाखल केली. दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलवर एकूण 40,000 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
मागील पाच दिवसांत रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढले आहेत. तर या वर्षी YTD आधारे स्टॉक 7.91 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 27 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 98 टक्के खाली पडले आहेत. याकाळात शेअरची किंमत 410 वरून घसरून 9.55 रुपयेवर आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price 500111 RELCAPITAL stock market live on 04 March 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x