
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.23 टक्के वाढीसह 238.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: ASHOKLEY) शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 242 रुपये किमतीवर फ्रेश गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक मजबूत कमाई करून देऊ शकतो. (अशोक लेलँड कंपनी अंश)
तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 255-260 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 230 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 3.37 टक्के घसरणीसह 230.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
5 वर्षांत दिला 260% परतावा
मागील 1 आठवड्यात अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.23 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.07 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात अशोक लेलँड स्टॉक 34.30 टक्के मजबूत झाला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55.68 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 260.35 टक्के वाढवले आहे.
कंपनीचा लाभांश वाटपाचा इतिहास :
एप्रिल 2024 मध्ये अशोक लेलँड या ऑटो स्पेस कंपनीने प्रति इक्विटी शेअर 4.95 रुपये लाभांश दिला आहे. कंपनीने जुलै 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 2.60 रुपये लाभांश वाटप केला होता. जुलै 2022 मध्ये या कंपनीने प्रति इक्विटी शेअर 1 रुपये आणि ऑगस्ट 2021 मध्ये प्रति इक्विटी शेअर 0.60 रुपये लाभांश वाटप केला होता. अशोक लेलँड ही हिंदुजा ग्रुपची उपकंपनी असून ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.