1 May 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर पुढे किती फायद्याचा? कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड या भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीचे शेअर्स सोमवारी 2 टक्के (NSE: AshokLeyland) घसरणीसह ट्रेड करत होते. ऑगस्ट 2024 मध्ये अशोक लेलँड कंपनीने 14,463 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यात कंपनीने 15,576 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या विक्रीत 7 टक्के घसरण झाली आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)

ऑगस्ट 2023 मध्ये अशोक लेलँड कंपनीची देशांतर्गत विक्री 14,545 युनिट्स होती. जी ऑगस्ट 2024 मध्ये 13347 युनिट्स वर आली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर यात 8 टक्के घसरण झाली आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.14 टक्के घसरणीसह 251 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

देशांतर्गत बाजारपेठेत अशोक लेलँड कंपनीच्या मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री 7,790 युनिट्स नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीची विक्री 9,013 युनिट्स होती, ज्यात 14 टक्के घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात अशोक लेलँड कंपनीची हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री ऑगस्ट महिन्यात 5,557 युनिट्स नोंदवली गेली होती.

मागील वर्षी याच कालावधीत कंपनीची विक्री 5,532 युनिट्स झाली होती. मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 8,663 युनिट्स होती, जी मागील वर्षीच्या 9,763 युनिट्सच्या तुलनेत 11 टक्के कमी आहे. मागील महिन्यात अशोक लेलँड कंपनीच्या एकूण हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री 5800 युनिट झाली होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 5813 युनिट नोंदवली गेली होती.

जून तिमाहीत अशोक लेलँड कंपनीचा एकूण महसूल 8598 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 525 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 576 कोटी रुपये होता. ऑपरेशनल आघाडीवर अशोक लेलँड कंपनीचा ऑपरेटिंग नफा 871 कोटींवरून वाढून 933 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाचा भाग असलेली ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये बस, ट्रक, इंजिन, संरक्षण आणि विशेष वाहनाचा समावेश होतो.

News Title | Ashok Leyland Share Price NSE: ASHOKLEYLAND 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या