
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह 248.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीचे 2.50 कोटींपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
जून तिमाहीत कंपनीने 509 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत अशोक लेलँड कंपनीने 544 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 10,754 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 9,735 कोटी रुपये कमाई केली होती. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 4.31 टक्के वाढीसह 257 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अशोक लेलँड कंपनीचे चेअरमन धीरज हिंदुजा यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “त्यांच्या व्यावसायिक वाहन उद्योगाने वर्षाच्या सुरुवातीला वाढीचा वेग कायम ठेवला आहे. कंपनी आपल्या खर्चावर लगाम ठेऊन बाजाराच्या केंद्रित कामगिरीसह उत्कृष्ट परिणाम पोस्ट करत आहे. स्विच मोबिलिटीच्या माध्यमातून अशोक लेलँड कंपनी स्पष्ट रोड मॅपसह वाढत्या ईव्ही मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज आहे”.
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने अशोक लेलँड स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग कायम ठेवली आहे. कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये वार्षिक आधारावर सुधारणा पाहायला मिळाली आहे. या कंपनीने 7 टक्के वार्षिक MHCV व्हॉल्यूम वाढीसह आपल्या स्पर्धकांना देखील मागे टाकले आहे. कंपनीसाठी स्पर्धात्मक तीव्रता आणि बाजारपेठेतील हिस्सा टिकवून ठेवणे महत्त्वाची बाब आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, पुढील काळात अशोक लेलँड स्टॉक मोठा परतावा देऊ शकतो शकतो.
अशोक लेलँड स्टॉक BSE-100 निर्देशांकाचा भाग आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 103 टक्के वाढवले आहेत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 231 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 10 वर्षांत अशोक लेलँड स्टॉकने लोकांना 639 टक्के नफा दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 72,309.52 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.