
BEL Share Price | मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. बजेटमधील अस्थिरतेमुळे BSE सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 80,429.04 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 24,479.05 अंकावर स्थिरावला होता.
अशा परिस्थितीत एचडीएफसी बँक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेड हे लार्जकॅप स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. सध्या तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही हे टॉप 3 शेअर्स खरेदी करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअरची स्टॉपलॉस किंमत आणि टार्गेट प्राइस.
भारत इलेक्ट्रॉनिक्स :
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 340-360 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 290 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा, अशी शिफारस देखील तज्ञांनी केली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरून 299.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बजाज फिनसर्व्ह :
SMC ग्लोबल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 1750-1760 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 1540 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा, अशी शिफारस देखील तज्ञांनी केली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 1,573.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
HDFC बँक :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 1750 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 1584 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा, अशी शिफारस देखील तज्ञांनी केली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 1,619 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.