
BEL Vs Tata Steel Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील इंडेक्स नवीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात टाटा स्टील लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
भारत इलेक्ट्रॉनिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 320-325 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 273 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.052 टक्के वाढीसह 290 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा स्टील :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 176 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 162.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पेट्रोनेट एलएनजी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 355 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना तज्ञांनी 303 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 327.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पेट्रोनेट एलएनजी स्टॉकने 320 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.