 
						BEML Share Price | बीईएमएल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 11 टक्के वाढीसह 5489 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअरने नुकताच 5,000 रुपयेचा टप्पा पार केला आहे. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले आहेत. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएमएल कंपनी अंश )
5 जून रोजी हा स्टॉक 3,685 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 3,095 रुपये किमतीवरुन 64 टक्के वाढले आहेत. 2024 या वर्षात हा स्टॉक 78 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात बीईएमएल स्टॉकची किंमत 218 टक्के मजबूत झाली आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी बीईएमएल स्टॉक 9.16 टक्के वाढीसह 5,082 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
बीईएमएल कंपनीचा 43 टक्के महसूल खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रातून येतो. तर 38 टक्के महसूल रेल्वे आणि 19 टक्के संरक्षण आणि एरोस्पेसमधून येतो. या कंपनीच्या महसूल संकलनात रेल्वेचे योगदान 27 टक्केवरून वाढून 38 टक्केपर्यंत वाढले आहे. 31 मार्च 2024 पर्यंत बीईएमएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 11872 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑर्डरमध्ये 39 टक्के वाढली आहे.
बीईएमएल कंपनीला रेल्वे विभागाकडून ICF कडून वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या 10 रॅकची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीकडे मोठे सरकारी ग्राहक आहेत. कंपनीच्या ग्राहकात कोल इंडिया लिमिटेड, संरक्षण मंत्रालय आणि अनेक मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन सारखे दिग्गज सामील आहेत. रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातून कंपनीला अनेक रिपीट ऑर्डर्स मिळतात.
बीईएमएल कंपनी सध्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करत आहे. पुढील दोन वर्षांत या कंपनीतून 25 टक्के कर्मचारी निवृत्त होण्याची अपेक्षा आहे. 2026 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खर्चात सुमारे 4 टक्के घट होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या वित्त खर्चात 15 टक्के कपात होईल. बीईएमएल कंपनीची स्थापना 1964 साली झाली होती. BEML ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी सरकारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी टाक्या, चिलखती वाहने, तोफखाना यांसारखी उत्पादने बनवण्याचे काम करते. ही कंपनी रेल्वे डबे, लोकोमोटिव्ह आणि वॅगन देखील बनवते. देशाच्या वाढत्या रेल्वे नेटवर्कमध्येही या कंपनीचे योगदान आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		