14 December 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BHEL Share Price | सरकारी कंपनीचा भरवशाचा शेअर! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्स अप्पर सर्किटवर, फायदा घेणार?

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच बीएचईएल या ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्रात व्यवसाय करण्यास कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 164.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएचईएल कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे पाहायला मिळत आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने बीएचईएल कंपनीला 16 प्रगत सुपर रॅपिड गन माउंट्स तसेच संबंधित उपकरणे आणि भारतीय नौदलासाठी सहायक उपकरणे खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी बीएचईएल स्टॉक 5.42 टक्के वाढीसह 174 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच भारत सरकारने बीएचईएल कंपनीसोबत करार 2,956.89 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा हलक्या पाण्याचा अणु प्रकल्प आहे. या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारताला फ्रान्स सरकारने सहकार्य केले आहे. या प्रकल्पाची ऊर्जा निर्मिती क्षमता 9.6 GW आहे. या प्रकल्पातून भारतातील 70 दशलक्ष घरांना वीज पुरवठा केला जाऊ शकतो.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 161 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर आज या कंपनीचे शेअर्स 165.75 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील पाच दिवसात बीएचईएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.39 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 36.74 टक्के मजबूत झाले आहे. 2023 या वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 95 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षात बीएचईएल 142.19 टक्के मजबूत झाला आहे. मागील 8 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 135 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE 30 November 2023.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x