
BHEL Share Price | बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने बीएचईएल स्टॉक खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
मागील 2 वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 570 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.31 टक्के घसरणीसह 321.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बीएचईएल ही कंपनी सरकारी उपक्रम म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी अवजड उपकरणे बनवण्यात एक्स्पर्ट मानली जाते. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल या महारत्न कंपनीचे शेअर्स 387 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 जुलै 2024 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर 325.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 19 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.
नुकताच भारत आणि रशियाने 6 उच्च उर्जा आण्विक संयंत्रे बांधण्याचा करार केला आहे. याचा फायदा बीएचईएल सारख्या सरकारी कंपनीला होणार आहे. बीएचईएल कंपनीला FGD प्रकल्पांमधून लक्षणीय फायदा मिळणार आहे. ज्या अंतर्गत 100 GW क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निविदा काढल्या जाणार आहेत. 100 GW क्षमतेचे FGD प्रकल्प आणि मजबूत ऑर्डर पाइपलाइनमुळे बीएचईएल कंपनीची कमाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
2024 या वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. 3 महिन्यांत बीएचईएल स्टॉक तब्बल 24 टक्के मजबूत झाला आहे. अवघ्या 6 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात बीएचईएल स्टॉक 245 टक्के आणि दोन वर्षात 572 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.