
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सकूमा एक्सपोर्ट ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 1 जुलै 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा आणि पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
सकूमा एक्सपोर्ट ही कंपनी आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 4 शेअर्स बोनस मोफत देणार आहे. मंगळवारी सकूमा एक्सपोर्ट स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 38.28 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी सकूमा एक्सपोर्ट स्टॉक 11.34 टक्के घसरणीसह 31.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 39.15 रुपये होती.
सकूमा एक्सपोर्ट कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. बोनस शेअर्स व्यतिरिक्त या कंपनीच्या संचालक मंडळाने 500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील एका वर्षात सकूमा एक्सपोर्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 164 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 87 टक्क्यांनी वाढली आहे. सकूमा एक्सपोर्ट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1106.18 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.