
Bonus Shares | गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. दिवाळीपूर्वीच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहेत. गिरीराज सिव्हिल कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स दिले आहेत. Giriraj Civil Developers Share Price
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के वाढीसह 2047 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी बोनस शेअर्स वाटप केल्यावर गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 409.25 रुपयेवर आली आहे.
गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गिरीराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4: 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सेबीला कळवले होते की, लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन, 2015 च्या रेग्युलेशन 42 नुसार, कंपनीने आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या एका शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उचांक किंमत पातळी 2050.00 रुपये होती आणि नीचांक किंमत पातळी 119.05 रुपये होती.
गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 458 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1537 टक्के परतावा कमावून दिला आहे. गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 932.90 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.