 
						Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 289.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी कॅप्री ग्लोबल कंपनीचे शेअर्स एक्स-बोनसवर व्यवहार करत होते. ( कॅप्री ग्लोबल कंपनी अंश )
आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जी घसरण पहायला मिळत आहे, ती बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटच्या ऍडजस्टमेंटमुळे पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी कॅप्री ग्लोबल कंपनीचे शेअर्स 13.14 टक्के घसरणीसह 251.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कॅप्री ग्लोबल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 141.46 रुपये होती. कॅप्री ग्लोबल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 5 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला होता. यासह कंपनीने आपले 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभाजित केले आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिटची पात्रता निश्चित करण्यासाठी 5 मार्च हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता.
कॅप्री ग्लोबल कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 69.89 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 30.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 635 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 मार्च 2019 रोजी कॅप्री ग्लोबल कंपनीचे शेअर्स 131.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 964.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात कॅप्री ग्लोबल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 675.35 रुपयेवरून वाढून 964.70 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 या वर्षात कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		