 
						Credit Card | आपल्या इथे सणासुदीला सुरुवात झाली असून लोकांनी आता सणांची खरेदी करायला सुरुवात केली आहे. आजच्या जगात क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणे सामान्य बाब बनली आहे. क्रेडिट कार्ड आता सर्वांसाठी एक काळाची गरज बनत चालली आहे. क्रेडिट कार्डद्वारे कार्ड धारकांना काहीही खरेदी केल्यावर नंतर पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासोबतच क्रेडिट कार्ड ग्राहकांनी जर वेळेवर बिल भरले तर त्यांचा क्रेडिट स्कोअरही सुधारला जातो. क्रेडिट कार्ड आजकाल खूप महत्वाचे आहेत,अडचणीच्या वेळी तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि काही काळानंतर क्रेडिट कार्ड कंपनीला बिल भरून पैसे रिटर्न करू शकता. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला पाहिजे, आणि आपले क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वेळोवेळी तपासले पाहिजे,
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काय आहे ?
समजा कोणत्याही पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले असेल,तर त्यावर तुम्हाला एक स्टेटमेंट दिली जाते, त्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुम्ही केलेल्या खर्चाचा तपशील, अटी आणि टक्केवारी दिलेल्या असतात. स्टेटमेंट मध्ये तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण शिल्लक रकमेचीही गणना केलेली असते. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट आणि अटी शर्ती जाणून घेणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च कराल आणि नंतर तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता. क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे असे पाच मुद्दे जाणून घेऊ
शुल्क आणि दंड :
क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला तुमच्या पेमेंट वर शुल्क आकारते. त्यासाठी क्रेडिट कार्ड घेतना नेहमी सर्वात आधी व्यवहार शुल्क माहीत करून घ्या. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी क्रेडिट कार्डच्या बिलावरील अतिरिक्त व्यवहार शुल्क आणि दंड पूर्णपणे वेळोवेळी तपासले पाहिजे. अनेकदा असे घडते की बँका निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारतात. त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता.
क्रेडिट मर्यादा तपासा :
प्रत्येक क्रेडिट कार्डची एक ठराविक क्षमता असते, त्याला आपण क्रेडिट लिमिट असे म्हणतो. तुम्ही क्रेडिट कार्ड घेताना आपल्या कार्डची क्रेडिट लिमिट जाणून घेतली पाहिजे. तुम्हाला थकबाकीची रक्कम आणि क्रेडिट मर्यादेबद्दल माहिती घेण्यास मदत होईल.
रिवॉर्ड पॉइंट:
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता, तेव्हा तुमच्या कार्ड वापरावर तुम्हाला काही रीवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. क्रेडिट कार्ड धारकांनी त्यांचे रिवॉर्ड पॉइंट्स मुदत संपण्यापूर्वी वापरावे, नाहीतर त्याची मुदत संपली की तुम्हाला ते वापरता येणार नाही. स्टेटमेंटमध्ये क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेले पॉइंट्स समाविष्ट केलेले असतात. ह्याबद्दल आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीकडून सविस्तर माहिती करून घ्या.
क्रेडिट धोरणांमधील बदल :
क्रेडिट कार्ड कंपनी आपल्या क्रेडिट कार्ड धोरणांमध्ये बदक करत असते. हे तुम्ही तुमच्या मासिक स्टेटमेंट मधून जाणून घेऊ शकता. नवीन अटी आणि शर्तींमधील बदल महिन्याच्या तपशिलांमध्ये सविस्तर दिलेले असते. म्हणून स्टेटमेंट नियमित तपासणे, हे तुम्हाला अपडेट राहण्यास मदत करते.
अपरिचित व्यवहार किंवा स्कॅम :
ऑनलाइन आर्थिक व्यवहार जसजसे सोपे होत चालले आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोणीही अजाण व्यक्ती हॅकर्सकडून फिशिंगचा बळी पडू शकतो. आपण नियमित क्रेडिट कार्ड व्यवहाराचे पुनरावलोकन केले पाहिजे. तुम्ही नियमित तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या कार्डाने कोणताही चुकीचा व्यवहार झालेला नाही. सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. आणि आता तुम्हाला अनेक खरेच्या ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जातील, तुम्हाला आकर्षित करण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या अनेक योजना आखतात, योग्य पणे कार्डचा वापर केलात तर तुम्ही कोणत्याही आर्थिक स्कॅम चा बळी ठरणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		