27 April 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

PPF Scheme | केवळ 500 रुपयांच्या बचतीवर जॅकपॉट परतावा, तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीची हमी देणारी आहे ही योजना

PPF scheme

PPF Scheme | PPF ही भारत सरकारद्वारे संचालित योजना आहे, ज्याच्या सुरक्षेची आणि हमखास परताव्याची हमी भारत सरकार देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून खाते उघडू शकता. सध्या पीपीएफ खात्यात वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड :
ही एक अशी योजना आहे, जी सुरक्षिततेच्या बाबतीत तसेच हमखास परताव्याच्या बाबतीत इतर योजनांपेक्षा वेगळी आहे. इतर कोणत्याही फंडांतील गुंतवणुकीपेक्षा पीपीएफ मध्ये जास्त व्याज परतावा मिळतो. यामुळे, PPF योजना भारतातील सर्वात लोकप्रिय बचत निधी योजनापैकी एक आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी चा कमाल कालावधी १५ वर्ष असतो. तसेच, ही योजना EEE श्रेणी अंतर्गत येते. याचा अर्थ तुम्हाला या योजनेत गुंतवणूक, व्याज परतावा आणि मॅच्युरिटी बेनिफिटवर कर सवलत लाभ मिळतो.

योजना सविस्तर :
आपण स्वतःच्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून PPF योजना खाते उघडू शकता. सध्या पीपीएफ खात्यात वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा आहे. तुम्ही कमाल 12 व्यवहारांद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता. तसेच लक्षात ठेवा की की जर तुम्ही पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त पैसे गुंतवले तर तुम्हाला अतिरिक्त रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही किंवा या रकमेवर तुम्हाला आयकर सूटही मिळणार नाही.

कालावधी आणि परतावा :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. मुदतीनंतर, तुम्ही एक किंवा अधिक प्रसंगी योजना कालावधी वाढवण्यासाठी अर्ज करू शकता. असा अर्ज केल्यानंतर, मुदत कालावधी पुढील पाच वर्षांसाठी वाढविला जाईल. सरकार दर तिमाहीच्या सुरुवातीला पीपीएफवरील व्याजदर निश्चित करते. सध्या हा व्याज दर 7.1 टक्के आहे. या योजनेचा व्याज परतावा दरवर्षी 31 मार्च रोजी दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता.

कर सवलत आणि इतर लाभ :
या योजनेतील गुंतवणुकीवर, योजनाधारकाला आयकर कायदा 80C अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ मिळेल. त्याच वेळी, त्याचा जो व्याज परतावा उत्पन्न असेल पूर्णपणे आयकराच्या कक्षेबाहेर असेल. तुमचे पीपीएफ खाते किती जुने आहे आणि त्यात जमा केलेली रक्कम याआधारावर तुम्ही कर्ज घेण्यास आणि पैसे काढणे पात्र असाल. गुंतवणुकीची सुरुवात केल्यापासून तिसऱ्या वर्षी ते सहाव्या वर्षाच्या दरम्यान तुम्ही गरज असेल तर कर्ज घेऊ शकता. सातव्या आर्थिक वर्षापासून तुम्हाला थोडे पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते. तुम्ही जर कोणत्याही आर्थिक वर्षात किमान 500 रुपये भरण्यात अयशस्वी ठरलात तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल. या प्रकरणात, जर तुमचे खाते बंद झाले आणि तुम्हाला ते पुन्हा सुरू करायचे असेल. तर त्याची एक प्रक्रिया आहे.

संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या:
1. सर्व प्रथम, तुमचे पीपीएफ खाते ज्या ठिकाणी असेल समजा पोस्ट ऑफिस किंवा बँकेत, तिथे लेखी अर्ज करा. तुम्ही खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील १५ वर्षांसाठी हा अर्ज करू शकता.
2. जोपर्यंत तुमचे खाते सक्रिय होत नाही, तोपर्यंत एका आर्थिक वर्षात 500 रुपये दराने पैसे जमा करावे लागतील. तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चेकद्वारे पैसे जमा करावे लागतील.
3. बँका किंवा पोस्ट ऑफिस द्वारे तुमचे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी 50 रुपये दंड आकारला जाईल. तुमची मासिक देय रकम भरण्यासोबतच तुम्हाला दंड देखील भरावा लागेल.
4. अर्ज जमा केल्यानंतर, बँक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या अर्जाची छाननी करेल. जर ठेवीचा कालावधी 15 वर्षे पूर्ण झाला असेल, तर हे खाते पुन्हा सक्रिय करता येणार नाही. दुसरीकडे, 15 वर्षे पूर्ण झाली नसल्यास, दंड भरल्यानंतर ते पुन्हा चालू केले जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF schemes benefits for good return on 1 August 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x