1 December 2022 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा
x

EPF Money | तुम्हाला बेसिक सॅलरी 14 हजार रुपये असल्यास हातात ईपीएफचा किती पैसा मिळेल समजून घ्या

EPFO Scheme

EPF Money | गुंतवणूक बाजारात अनेक अल्पबचत योजना उपलब्ध आहेत जे दीर्घकाळात गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून देतात. पगारदार लोकांना एक ठराविक रक्कम मिळत असते, त्यातून बचत करणे आणि गुंतवणूक करणे थोडे कठीण जाते. त्यासाठी भारत सरकारने अशा लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना सुरू केली आहे. संघटित क्षेत्रात काम करणारे बहुतांश कर्मचारी EPFO चे सदस्य असतात. EPFO आजच्या घडीला करोडो खातेदारांच्या खात्यांचे व्यवस्थापन करते. या खात्यांमध्ये, कर्मचारी आणि नोकरी देणारी संस्था दोघांकडून मूळ महागाई भत्त्याच्या 24 टक्के रक्कम जमा केली जाते. दरवर्षी सरकार या EPFO खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजदर ठरवत असते. सध्या यावर EPFO मधील गुंतवणुकीवर 8.1 टक्के व्याज दिला जातो.

गुंतवणुकीतून तयार करता येतो मोठा निधी :
बचत आणि EPFO मध्ये गुंतवणूक करताना अनेक लोकांना EPF चे फायदे माहिती नसतात. जर तुम्ही EPFO मध्ये नियमित गुंतवणुक केल्यास आणि अधूनमधून पैसे न काढल्यास निवृत्तीपर्यंत EPFO वर जबरदस्त व्याज परतावा मिळू शकतो. EPFO मध्ये गुंतवणूक करत असलेल्या बऱ्याच लोकांना यावरील व्याज परतावा आणि त्याचा हिशोबही माहित नसतो. लक्षात ठेवा की पीएफ खात्यातून पेन्शन फंडात जाणाऱ्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही. निवृत्तीपर्यंत तुम्ही किती निधी तयार करू शकता हे आपण एक छोटा हिशोब करून समजू शकतो.

एक छोट्या हिशोबाने EPFO चे फायदे समजून घेऊ :
* समजा तुमचे वय सध्या 25 वर्ष असून तुमचे मासिक मूळ वेतन 14000 रुपये आहे.
* वय : 25 वर्षे
* मूळ पगार + DA : 14000 रुपये
* सेवानिवृत्तीचे वय : 58 वर्षे
* कर्मचार्‍याचे मासिक योगदान : 12 टक्के
* नियोक्त्याकडून मासिक योगदान : 12 टक्के
* वर्तमान व्याजदर : 8.1 टक्के
* निवृत्ती नंतर मिळणारा एकूण निधी: 24072613 रुपये

तुम्ही EPFO मध्ये तुमचे योगदान हवे तेवढे वाढवू शकता. या योजनेत व्याजाचा आढावा दर वार्षिक आधारावर घेतला जातो. EPFO मध्ये चक्रवाढ व्याजामुळे दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जबरदस्त परतावा मिळतो. EPFO मध्ये तुम्ही तुमचे मासिक योगदान वाढवू शकता, अनेक कंपन्या नोकरी देताना किंवा जॉब जॉईन करताना EPFO ची मासिक रक्कम वाढवण्याचा पर्याय देतात.

EPF वरील व्याज गणना :
PF खात्यात तुम्ही दर महिन्याला जी रक्कम जमा करता, त्या आधारावर व्याज गणना केली जाते. पण, हे व्याज वर्षअखेरीस तुमच्या EPFO खात्यात जमा केली जाते. EPFO च्या नियमांनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत शिल्लक रकमेतून रक्कम काढली तर त्यावर 12 महिन्यांचे पूर्ण व्याज कापले जाईल. EPFO नेहमी खाते उघडण्याची आणि बंद करण्याची शुल्क आकारते. या योजनेत तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि तुम्हाला दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| EPFO scheme is providing returns at the compound interest rate of 8.1 percent for long term investment on 07 October 2022.

हॅशटॅग्स

EPFO Calculator(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x