
Flipkart Sale Offer | जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयफोन खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, खरं तर सध्या सुरू असलेल्या फाइव्ह डे इलेक्ट्रॉनिक्स सेल अंतर्गत फ्लिपकार्टवर आयफोन 11, 12 आणि 13 वर भरघोस सूट मिळत आहे. हा सेल 10 जुलैपर्यंत चालणार आहे.
६४ जीबी स्टोरेजचा आयफोन-11 :
फ्लिपकार्ट ६४ जीबी स्टोरेजचा आयफोन-11 ऑफरसह 42,999 रुपयांना विकत आहे. याची मूळ किंमत ४९,९०० रुपये आहे. याशिवाय कंपनी 47,999 मध्ये 128 जीबी स्टोरेज मॉडेल ऑफर करत आहे, तर याची किंमत 54,900 रुपये आहे. अशात आयफोन 11 वर जवळपास 6900 रुपयांची सूट मिळत आहे.
आयफोन १२ वर डिस्काउंट :
फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये आयफोन 12 वर देखील सूट मिळत आहे. ६४ जीबी आयफोन मॉडेल 54,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ६५,९०० रुपये आहे. त्याचबरोबर १२८ जीबी मॉडेल्स 59,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहेत, ज्याची मूळ किंमत 70,000 रुपये आहे. आयफोन १२ मॉडेलच्या फोनमध्ये देण्यात आलेली सूट सुमारे १०,९०१ आहे.
आयफोन 13 वर किती सूट :
आयफोन १३ मिनीचा १२८ जीबी व्हेरिएंट 64,999 रुपयांना उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ६९,९०० रुपये आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्टवर आयफोन 13 च्या 128 जीबी फोनची किंमत 73,999 रुपये आहे. याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. अशाप्रकारे आयफोन 13 मॉडेलवर फोनवर 4,901 ची सूट मिळत आहे. याशिवाय ५१२ जीबी आयफोन १३ मिनीफ्लिपकार्टवर 92,999 रुपयांना उपलब्ध आहे, तर त्याची मूळ किंमत ९९,९०० रुपये आहे.
अतिरिक्त बँक आणि एक्सचेंज ऑफर :
याशिवाय ग्राहकांना आयफोन 11 आणि 12 खरेदी करताना एक्सचेंज ऑफर म्हणून 12,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. त्याचबरोबर आयफोन 13 च्या खरेदीवर ग्राहकांना 14,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.
सीआयटीआय क्रेडिटवर दोन हजार रुपयांची सूट :
फ्लिपकार्टने सिटी बँकेशीही करार केला असून, यामध्ये सीआयटीआय क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 2 हजार रुपयांची सूट मिळू शकते. मात्र ही ऑफर फक्त आयफोन 11 फोनला लागू आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये अॅक्सिस बँक कार्डवर 5% कॅशबॅक देत आहे. तसेच फोन ईएमआयवर खरेदी करता येईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.