14 December 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Global Recession | अतिशय वाईट आर्थिक मंदी येण्याचे संकेत, 2008 च्या आर्थिक मंदीचे भाकीत करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञाने व्यक्त केली भीती

Global Recession

Global Recession | प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ नॉरिएल रुबिनी यांनी 2022 वर्षाच्या शेवटी अमेरिका आणि जगातील इतर आर्थिक महासत्ता देशांमध्ये “दीर्घ आणि अत्यंत वाईट” आर्थिक मंदी येणार आहे, असे भाकीत केले आहे. नॉरिएल रुबिनी यांना 2008 च्या आर्थिक मंदीचे अचूक भाकीत करण्यासाठी ओळखले जाते. नॉरिएल रुबिनी यांच्या मते आता येणारी ही आर्थिक मंदी 2022 च्या शेवटी सुरू होईल, आणि 2023 च्या शेवटपर्यंत टिकून राहील,असे भाकीत अर्थतज्ज्ञ नोरिएल रूबिनी यांनी केले आहे. आर्थिक मंदीच्या काळात स्टँडर्ड अँड पुअर्स 500 म्हणजेच S&P 500 मध्ये अभूतपूर्व अशी घसरण होईल, जी या आधी कधीही झाली नव्हती.

S&P 500 मध्ये होईल कमालीची घसरण :
“S&P 500 मध्ये 30 टक्क्यांपर्यंत घसरण होल्याचा अंदाज : नॉरिएल रुबिनीच्या म्हणण्यानुसार S&P 500 मध्ये सातत्याने अस्थिरता राहिली तर ही घसरण 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. नॉरिएल रुबिनी यांनी आधीच S&P 500 मध्ये किमान 30 टक्के घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आर्थिक मंदी येण्याचे संकेत अधिक प्रबळ झाल्याचे दिसून येत आहेत.

डॉक्टर डुम यांचे मत :
2007 आणि 2008 मध्‍ये हाऊसिंग क्षेत्रात निर्माण झालेल्या फुगवट्यामुळे आर्थिक मंदी येणार असा अचूक अंदाज नोरिएल रुबीनी यांनी लावला होता. त्यावेळी त्यांचा आर्थिक संकटाचा अंदाज एकदम अचूक ठरला होत, आता असाच आणखी एक अंदाज व्यक्त करून त्यांनी संपूर्ण जगाला नवीन टेंशन दिले आहे. 2008 मध्ये केलेले भाकीत खरे ठरल्यावर नॉरिएल रुबिनी प्रसिद्धीच्या झोतात आले आणि त्यांना आर्थिक क्षेत्रात “डॉक्टर डूम” म्हणून ओळखले जाऊ लागले. रुबिनी यांच्या मते अमेरिकेत थोडीशी आर्थिक घसरण अपेक्षित आहे, त्यासाठी त्यांनी कॉर्पोरेशन आणि सरकारच्या उच्च कर्ज प्रमाणाचा विचार करावा. सेवादर आणि सेवा खर्च वाढत आहेत त्यामुळे “अनेक झोम्बी संस्था, झोम्बी घरे, कॉर्पोरेशन, बँका, श्याडो बँक आणि झोम्बी देश आर्थिकरित्या गुदमरतील. त्यामुळे या आर्थिक मंदीच्या तावडीतून कोण सुटेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.” असे रुबिनी म्हणाले.

व्याजदरात प्रचंड वाढ होण्याचे संकेत :
रूबिनी यांनी असे मत व्यक्त केले आहे की, हार्ड लँडिंगशिवाय 2 टक्के महागाई दर गाठणे फेडरल रिझर्व्ह ऑफ अमेरिकासाठी “मिशन इम्पॉसिबल” ठरणार आहे. फेड पुढील महिन्यातील प्रलंबित बैठकीत 75 बेसिस पॉइंट्स ची वाढ करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 50 बेसिस पॉइंट्स प्रती महिन्याची वाढ केली जाईल. याचा अर्थ फेड ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत फेड फंड रेटमध्ये 4 टक्के ते 4.25 टक्के पर्यंत वाढ करेल.

महागाईवरील सुटत चाललेले नियंत्रण :
विशेषत: वेतन आणि सेवा क्षेत्रातील महागाई नियंत्रणात आणायची असेल तर फेडकडे व्याजदरात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही. रुबिनी म्हणाले की, फेड व्याज दर 5 टक्केच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याशिवाय, कोरोना मुळे निर्माण झालेले पुरवठा संकट, रशिया-युक्रेन युद्धसंघर्ष आणि चीनचे शून्य कोविड धोरण यामुळे आर्थिक मंदीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक वाढ कमी होऊ शकते, यामुळे महागाई वाढीचा वेग आणखी वाढू शकतो, आणि बेरोजगारीचा विस्फोट होऊ शकतो.

नॉरिएल रुबिनी यांनी भीती व्यक्त केली आहे की, एकदा जर का संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या गर्तेत गेले की, पुढे कोणत्याही सरकारी प्रोत्साहन उपायांची अपेक्षा करता येणार नाही, कारण खूप कर्ज असलेल्या सरकारांकडे “करण्यासारखे काही राहणार नाही”. उच्च चलनवाढीची परिस्थिती निर्माण होईल. उच्च चलनवाढीचा अर्थ असा होईल की “कितीही वित्तीय प्रोत्साहन दिले तरीही, मागणीमध्ये वाढ होतच राहते, आणि पुरवठा हवा तेव्हढा होत नाही.” परिणामी, रुबिनी यांना सध्याचा काळ 1970 च्या दशकाप्रमाणेच आर्थिक मंदीच्या रूपात प्रचंड कर्ज संकट आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या अगदी जवळ वाटत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Global Recession prediction has been made by Famous economist Noreal rubini on 24 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x