 
						GOCL Share Price | जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.66 टक्क्यांच्या घसरणीसह 570 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 641 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 275 रुपये आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2830 कोटी रुपये आहे.
मागील एका महिन्यात जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 550.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 6 महिन्यांत जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 100 टक्के वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 121 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 400 टक्के वाढला आहे. 13 मार्च 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आता 2300 टक्के वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 223 कोटी रुपये एकत्रित उत्पन्न कमावले होते. तर जीओसीएल कॉर्पोरेशन कंपनीने याच तिमाहीत 16 कोटी रुपये PAT नोंदवला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एनर्जेटिक आणि एक्सप्लोसिव्ह विभागातून जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 29 कोटी रुपयेची कमाई केलीआहे.
GOCL कॉर्पोरेशनच्या पूर्ण मालकीच्या Ideal Explosives Limited या उपकंपनीने सप्टेंबर तिमाहीत 138 कोटी रुपये कमाई केली आहे. सध्या Ideal Explosives Limited कंपनीकडे पुढील 2 वर्षांसाठी 1100 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		