
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( एचएएल कंपनी अंश )
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च तिमाहीमध्ये एचएएल कंपनीने 30 टक्के वाढीसह 1783.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी एचएएल स्टॉक 2.96 टक्के वाढीसह 4,923.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्च 2024 तिमाहीत एचएएल कंपनीने 8528.54 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये याच तिमाहीत कंपनीने 6456.58 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाही निकालानंतर HAL स्टॉकवर शेअर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्म नोमुराने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 300 रुपयांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एचएएल कंपनीचे शेअर्स खरेदी करून संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात एचएएल कंपनीचा बाजार हिस्सा, एकूण मार्जिन आणि खेळते भांडवल यामध्ये झपाट्याने सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान कंपनीची विक्री/एबिटा/PAT अनुक्रमे 19 टक्के, 20 टक्के, 22 टक्के, CAGR ने वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.