4 May 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Home Loan | तुम्हाला गृहकर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत माहित आहे? संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पाहा

Home Loan

Home Loan| आपले स्वतःचे घर खरेदी करणे हे सर्वांचे स्वप्न असते. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज घेण्यास प्राधान्य देतात, कारण घर खरेदी करणे म्हणजे फार मोठ्या रकमेची आवश्यकता असते. गृहकर्ज घेताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमच्याकडून तारण मागतात. ही तुमच्या कर्जाची गॅरंटी असते. मुदतीच्या शेवटी कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर, कर्जदाराला मालमत्तेची संपूर्ण मालकी प्रदान केली जाते.

गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्र :
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पत्ता पुरावा (कोणताही), वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी कर, मालमत्ता कर पावती, पोस्टपेड मोबाइल बिल, मालमत्तेची कागदपत्रे, वाटप पत्र आणि इतर कागदपत्रे. स्वयंरोजगार असलेल्या अर्जदारांना मागील सहा महिन्यांचा व्यवसायाच्या अस्तित्वाचा पुरावा, आर्थिक विवरणे आणि बँक खात्याचे तपशील कर्ज घेताना सादर करावे लागेल.

गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रोसेस :

1. गृह घेण्यासाठी तुम्हाला नजीकच्या बँकेला भेट द्यावी लागेल आणि गृहकर्जाचा अर्ज भरावा लागेल. अर्ज भरताना तुम्हाला तुमचे नाव, रोजगाराची माहिती, उत्पन्नाची माहिती आणि सर्व आवश्यक कागदपत्रे, पत्ता, फोन नंबर आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यासारखी माहिती अर्जात भरावी लागेल. अर्जात भरलेल्या सर्व माहितीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

2. गृह कर्जाचा अर्ज पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. तुमची माहिती सत्यापित करण्यासाठी आणि तुमच्या मालमत्तेची मालकी आणि मूल्य तपासण्यासाठी बँक तुम्हाला काही शुल्क आकारेल. सर्व बँका वेगवेगळे शुल्क आकारतात, जे सहसा कर्जाच्या 1 टक्के असू शकतात.

3. साधारणपणे, बँक तुमचा गृहकर्जाचा अर्ज मंजूर करायचा आहे किंवा नाकारयचा आहे हा निर्णय पाच दिवसांच्या आत घेते. कर्जावर चर्चा करण्यासाठी बँक तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी बोलवू शकते.

4. तुम्ही गृहकर्जासाठी पात्र आहात की नाही हे निर्धारित करण्यासाठी बँक किंवा गृह कर्ज देणारी वित्तीय संस्था तुमची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू करेल. बँकेचे प्रतिनिधी घरी येऊन पडताळणी करू शकतात आणि तुम्ही दिलेल्या माहितीची खातरजमा करू शकतात.

5. गृहकर्जाचा अर्ज विचारात घेताना तुमचा CIBIL स्कोर आणि क्रेडिट कार्ड रिपोर्ट तपासला जातो. तुमचा गृहकर्जाचा अर्ज सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंजूर केला जाईल.

6. तुमचा गृहकर्ज अर्ज स्वीकारला गेल्यास, बँक तुम्हाला कर्जाची रक्कम, व्याजदर, व्याजाचा प्रकार, कर्जाचा कालावधी आणि अटी व शर्तींच्या तपशीलांसह एक मंजुरी पत्र देईल. जर तुम्ही कर्जाच्या अटींशी सहमत असाल, तर तुम्ही त्यावर स्वाक्षरी करून बँकेला ती प्रत सादर करायची असते.

7. स्वीकृती पत्रावर तुमची स्वाक्षरी झाल्यानंतर, तुम्हाला वन टाईम सेक्यूरिटी चार्ज भरावा लागेल.

8. पुढील भागात बँक कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या ज्या मालमत्तेच्या खरेदीसाठी अर्ज आला आहे, त्यांची पडताळणी करते. कोणत्याही संभाव्य विवाद किंवा संघर्षाची चौकशी करण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्था त्या मालमत्तेची पडताळणी करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवू शकते.

9. संपूर्ण पडताळणी प्रक्रिया संपल्यानंतर तुम्हाला गृहकर्जाच्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल आणि त्यानंतर बँक तुमच्या खात्यात गृहकर्जाची रक्कम जमा करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Home Loan Application process for Buying New house on 16 October 2022.

हॅशटॅग्स

#Home Loan(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x