
Hot Stocks | शुभम पॉलिस्पिन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 35 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. आणि सध्या शेअरची किंमत 280 रुपयांच्या पुढे गेली आहे. कंपनी आता बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर जाहीर करण्याबाबत चर्चा होणार आहे.
वस्त्रोद्योगाशी संबंधित हा स्मॉल कॅप कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनीची चर्चा करत आहोत ही कंपनी आहे शुभम पॉलिस्पिन लिमिटेड. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांच्या पैशात 35 टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. शुभम पॉलिस्पिन लिमिटेडचे शेअर्स 209 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 280 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. 13 ऑगस्ट 2022 शुभम पॉलिस्पिनची रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली जाऊ शकते.
शुभम पॉलिस्पिन लिमिटेडच्या शेअर्समध्ये मागील दीड महिन्यात 70 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागील काही काळापासून ह्या शेअर्स मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुभम पॉलिस्पिनच्या शेअरने मागील दीड महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 23 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 152 रुपयांवर ट्रेड करत होते. 8 ऑगस्ट 2022 रोजी बीएसईवर कंपनीचे शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली होती आणि दिवसा अखेर शेअर्स 283.50 रुपयांवर जाऊन बंद झाले. शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्सने या वर्षी आतापर्यंत जवळपास 63 टक्के वाढ दर्शवली आहे.
110 टक्के पेक्षा जास्त वाढ :
12 ऑक्टोबर 2018 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 21.38 रुपयांच्या पातळीवर होते. त्या नंतर शुभम पॉलिस्पिनचे शेअर्स 110% पेक्षा जास्त वाढले आहेत. 8 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 283.50 रुपये वर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 1192 टक्के परतावा दिला आहे. शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्सने मागील एका वर्षात जवळपास 135 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 283.50 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी 112.80 रुपये आहे.
फॉरेन इंवेस्टमेंट फंड एजी डायनॅमिक फंड्सने नुकतेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड असलेल्या शुभम पॉलिस्पिन या कंपनीचे 102000 शेअर्स खरेदी केले आहेत. एजी डायनॅमिक फंड्सने कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारातून 215.05 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतले आहेत. बल्क डील डेटानुसार, हा व्यवहार सुमारे 2.19 कोटी रुपयेचा होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.