20 May 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज
x

IRFC Vs Titagarh Share Price | रेल्वे संबंधित कोणता शेअर खरेदी करावा? IRFC शेअर्स की टिटागड रेल शेअर्स, कोणाबद्दल आनंदाची बातमी?

Titagarh Rail Share Price

IRFC Vs Titagarh Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या रेल्वेसाठी वस्तू बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कंपनीने नुकताच आपली लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 22 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्क्यांच्या वाढीसह 807 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,255.08 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 2.36 टक्के वाढीसह 825.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर्सची कामगिरी

टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 225 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने लोकांना 255 टक्के परतावा कमावून डोळा आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून 415 टक्के परतावा कमावला आहे.

मागील तीन वर्षांत टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1720 टक्के नफा कमावून दिला आहे. 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीने 914.65 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीमध्ये कंपनीने 981.20 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणेजच या जून तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात 6.78 टक्के घट पाहायला मिळाली आहे. जून तिमाही कालावधीत टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीने 61.78 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Titagarh Rail Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

Titagarh Rail Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x