16 May 2024 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Equitas Bank Share Price | अल्पावधीत कमाई! इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर 30 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पहा

Equitas Bank Share Price

Equitas Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स मजबूत तेजीत धावत होते. नुकताच इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम, 2019 अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना 20,72,276 इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. या बँकेने शुक्रवारी सेबीला यासंदर्भात माहिती कळवली होती.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे तज्ञ इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांच्या मते इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स पुढील काळात 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 87.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस

शेअर बाजारातील तज्ञांनी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरवर 109 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच या बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 30 टक्के परतावा सहज मिळू शकतो. सध्या या शेअरची किंमत 87 रुपये आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक आधीच्या तुलनेत 4.23  टक्के वाढला होता. 27 जुलै 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 101.16 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर खाली आला होता. आत पुन्हा स्टॉकमध्ये वाढीचे संकेत मिळत आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी

इक्विटास स्माल फायनान्स बँकेने एप्रिल-जून 2023 या तिमाहीत 97.1 टक्के वाढीसह 191.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत या बँकने 97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने 573.59 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

या जून तिमाहीत इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने 1,425.32 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच जून तिमाहीत बँकेने 1,073.61 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने 4,831.46 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Equitas Bank Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

Equitas Bank Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x