
HUDCO Share Price | हुडको या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी हुडको स्टॉक 8.60 टक्क्यांच्या वाढीसह 327.80 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 7.65 टक्क्यांच्या वाढीसह 324.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात हा स्टॉक 151.61 टक्क्यांनी वाढला आहे. ( हुडको कंपनी अंश )
मागील आठवड्यात गुरूवारी हुडको स्टॉकच्या व्यवहारात 12.81 लाख या दोन आठवड्यांच्या सरासरी ट्रेडिंगच्या तुलनेत 66.71 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या शेअर्समध्ये एका दिवसात 213.22 कोटी रुपयेची उलाढाल झाली होती. हुडको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 65,051.74 कोटी आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी हुडको स्टॉक 2.85 टक्के वाढीसह 337.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
वेल्थमिल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, चालू महिन्याच्या अखेरीस जाहीर केल्या जाणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात ग्रामीण गृहनिर्माणासाठी आर्थिक तरतूद केली जाईल, या आशेने हुडको स्टॉक तेजीत आला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीची योजना असलेले गुंतवणुकदार हा सरकारी स्टॉक खरेदी करून बक्कळ कमाई करू शकतात.
जर तुम्ही हुडको कंपनीचा टेक्निकल चार्ट पाहिला तर तुम्हाला समजेल की, या स्टॉकने 315 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मात्र या स्टॉकमध्ये 330 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, हुडको स्टॉकने 300-280 रुपये या झोनमध्ये मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या खाली आला तर गुंतवणूकदारांनी तत्काळ नफा वसुली करावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, हुडको स्टॉक 330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 315 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हुडको ही सरकारी कंपनी मुख्यतः गृहनिर्माण वित्त आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त सुविधा पुरवण्याचा व्यवसाय करते. मार्च 2024 पर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 75 टक्के भागभांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.