
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO एकूण 106.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात.गुंतवणूक केली. (ideaForge Technology Share Price)
IPO चा रिटेल कोटा 85.16 पट सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 80.58 पट सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा कोटा 125.81 पट सबस्क्राईब झाला होता. (ideaForge Share Price)
आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 550 रुपयेवर ट्रेड करत होती. ग्रे मार्केटमध्ये ही आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO स्टॉक धमाकेदार कामगिरी करत होता. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची शेअर किंमत बँड 638-672 रुपये निश्चित करण्यात आली होती.
जर हा IPO स्टॉक 672 रुपयेच्या अप्पर प्राइस बँडवर इश्यू करण्यात आला आणि ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 550 रुपये टिकुन राहिली तर या कंपनीचे शेअर्स 1222 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना लिस्टिंग पहिल्याच दिवशी 80 टक्के पेक्षा जास्त घसघशीत परतावा मिळू शकतो.
10 जुलैला स्टॉक लिस्टिंग
आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचे IPO शेअर्स 5 जुलै 2023 रोजी वाटप केले जातील. त्याच वेळी या कंपनीचे शेअर्स 10 जुलै 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहेत.
किरकोळ गुंतवणूकदार आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटमध्ये पैसे लावू शकत होते. कंपनीने एका लॉटमध्ये 22 शेअर्स जारी केले होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा एकूण आकार 567 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.