2 May 2025 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Income Tax | तुम्ही हॉस्पिटल बिल्स, लग्नाचे हॉल यासाठी कॅशने पेमेंट केलं आहे?, केंद्राच्या आयकर विभागाकडून नोटीसची शक्यता

Income Tax

Income Tax | करचुकवेगिरी रोखण्यासाठी आयकर विभाग रुग्णालये, बँक्वेट हॉल आणि छोट्या व्यवसायातील रोख व्यवहारांवर लक्ष ठेऊन आहे. तुम्ही अशा प्रकारे पैसे भरलेत तर सावधानता बाळगण्याची गरज आहे, अन्यथा आयकर विभाग तुमची चौकशी करू शकतो. केंद्र सरकार स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सामान्य लोकांच्या रोख स्वरूपातील लहान व्यवहारांवर देखील लक्ष ठेवून आहे.

आयकर विभागाच्या मते, कर्ज किंवा डिपॉझिटसाठी २०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारण्यास मनाई आहे आणि असे व्यवहार केवळ बँकिंग चॅनेलद्वारेच केले जावेत. याव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीकडून एकूण 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम मिळण्याची परवानगी नाही. लोक नोंदणीकृत ट्रस्ट किंवा राजकीय पक्षाला रोखीने दिलेल्या देणग्या वजावट म्हणून नोंदवू शकत नाहीत.

रुग्णालय आणि छोट्या कॅश गुंतवणूक :
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रुग्णालयांसह काही संस्था, व्यवसायांतील कॅश व्यवहारांवर विभाग लक्ष ठेवून आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, अनेक प्रकरणांमध्ये, आरोग्य सुविधांनी दाखल झाल्यावर रुग्णाचे पॅन कार्ड घेण्याच्या नियमाचे उल्लंघन केले.

रुग्णालयांवर वॉच :
अशा रुग्णालयांवर आता आयकर विभाग कारवाईचा विचार करत आहे. खासगी वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे भरलेल्या रूग्णांचा मागोवा घेण्यासाठी आरोग्य सेवा प्रदात्यांकडून डेटा वापरण्याची विभागाची योजना आहे. टॅक्स विभाग दाखल केलेल्या विवरणपत्रांमध्ये कोणतीही तफावत शोधण्यासाठी वार्षिक माहिती स्टेटमेंट्ससारख्या तपशीलवार डेटाचा वापर करीत आहे.

बँक्वेट हॉलवरही होणार कडक कारवाई :
बँक्वेट हॉलच्या बाबतीतही ते व्यवहारांची नोंद ठेवत नसल्याचे आढळून आले आहे. अशा काही बँक्वेट हॉलवर आणि कॅश पेमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काही व्यावसायिकांचीही चौकशी सुरू असल्याचं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या विरोधात ठोस पुरावे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

छोट्या आणि मोठया शहरांतील करचुकवेगिरी करणाऱ्यांना आपण प्राप्तिकर विभागाच्या रडारवर येणार नाही आणि त्यांच्या नजरेतून तारून जाऊ, असा विश्वास वाटतो, असे आयकर विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे अशा शहरांमध्ये आयकर विभागाचे फारसे अधिकारी नाहीत. या दृष्टीकोनातून रोखीच्या व्यवहारांचीही चौकशी हा विभाग करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Income Tax if you have pay cash in banquet halls hospitals income tax department can investigate check details 22 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Income Tax(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या