
Infosys Share Price | सध्या जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण होत आहे. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. अमेरिकेत प्रचंड महागाईने लोकांना हैराण केले आहे. जागतिक व्यवसायावर याचा थेट परिणाम होत आहे. एकीकडे आयटी क्षेत्रातील मंदीमुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लोकांच्या नोकऱ्यावर टांगती तलवार बनून लटकली आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील आयटी शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. भारतातील टॉप 4 आयटी कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि विप्रो कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. इन्फोसिस, एचसीएल टेक आणि विप्रो कंपनीच्या शेअर्सच्या तुलनेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स अजूनही मजबूत स्थितीत आहेत.
अमेरिकन आयटी कंपनीच्या महसूल कमाईत प्रचंड प्रमाणात घट नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीच्या निकालापूर्वी अमेरिकेतील आघाडीच्या आयटी कंपनीच्या महसूल संकलनात जबरदस्त घसरण नोंदवली गेली होती. मात्र भारतीय आयटी कंपन्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एचसीएल टेक कंपनीचे शेअर्स 1306 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1700 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तसेच इन्फोसिस स्टॉकमध्ये देखील प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. जर या स्टॉकमध्ये विक्री वाढली तर शेअर 1200 रुपयेच्या खाली जाऊ शकतो. आणि तेजीच्या काळात शेअर 1610 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.092 टक्के वाढीसह 1,415.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, तेजीच्या काळात विप्रो कंपनीचे शेअर्स 678 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस स्टॉक 4450 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.