
Instant Loan on App | ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन कर्ज व्यवसाय वेगाने वाढत आहे. त्याच्यासह ग्राहकांकडून फसवणूक झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशा वाढत्या तक्रारींवर खुद्द आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. ॲपवर आधारित कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकांनी काय अंमलबजावणी करावी, याची माहिती आरबीआय गव्हर्नरांनी दिली. तसेच, फसवणूक झाल्यास रिझर्व्ह बँक कोणत्या संस्थांवर कारवाई करू शकते?
आरबीआय केवळ नोंदणीकृत संस्थांवरच कारवाई करू शकते :
अॅपच्या माध्यमातून कर्ज घेण्याच्या बाबतीत काही अडचण आली तर रिझर्व्ह बँक आपल्या नोंदणीकृत संस्थांच्या बाबतीतच कारवाई करू शकते, असं आरबीआयचं म्हणणं आहे.
ॲप बद्दल अधिक माहिती घ्या :
हे ॲप वापरण्यापूर्वी ते ॲप आरबीआयकडे रजिस्टर्ड आहे की नाही हे तपासा, अशी सूचना आरबीआयने लोकांना केली आहे. ॲपची नोंदणी झाल्यास मध्यवर्ती बँक फसवणूक झाल्यास तात्काळ कारवाई करणार आहे. आरबीआयच्या वेबसाइटवर नोंदणीकृत ॲपची यादी आहे.
आरबीआयने सतर्कतेचा इशारा का दिला :
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वेळा एजंट किंवा कर्ज देणाऱ्या ॲपच्या अधिकाऱ्यांनी छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. कर्ज घेताना ग्राहक त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की मोबाइल कॉन्टॅक्ट्स ॲपशी शेअर करण्यास मान्यता देतात, त्याचा फायदा घेऊन एजंट/संस्थेचे अधिकारी त्याच्या ओळखीच्या समोरच कर्जदाराची बदनामी करतात. यामुळे काही जण आत्महत्याही करतात.
बहुतेक अॅप्स नोंदणीकृत नाहीत :
आरबीआय गव्हर्नरच्या मते, बहुतेक डिजिटल लेंडिंग ॲप आरबीआयकडे नोंदणीकृत नाहीत आणि ते स्वत: हून ऑपरेट करतात. जेव्हा जेव्हा आरबीआयकडे एखाद्या ग्राहकाकडून तक्रार येते, तेव्हा अशा नोंदणी नसलेल्या अॅपच्या ग्राहकांना स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले जातात, जे या प्रकरणाची चौकशी करतील आणि आवश्यक ती कारवाई करतील.
स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा :
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, जर डिजिटल पद्धतीने कर्ज देणाऱ्या अॅप्सची नोंदणी झाली नसेल, त्यांना काही अडचण आली तर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.