
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आज 6 मार्च 2024 पासून श्री करणी फॅबकॉम कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीच्या आयपीओचा आकार 42.49 कोटी रुपये आहे. श्री करणी फॅबकॉम कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 220 रुपये ते 227 रुपये निश्चित केली आहे. ( श्री करणी फॅबकॉम कंपनी अंश )
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, श्री करणी फॅबकॉम कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 300 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये या किमतीवर टिकला तर शेअर्स 500 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणुकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.
श्री करणी फॅबकॉम कंपनीचा IPO 6 मार्च ते 11 मार्च दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. तर 12 मार्च रोजी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप केले जातील. आणि 14 मार्च रोजी शेअर्स सूचीबद्ध होऊ शकतात. कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 600 शेअर्स ठेवले आहे.
एक IPO लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 136200 रुपये जमा करावे लागतील. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 18.72 कोटी फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 96.16 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर IPO नंतर प्रवर्तकांचे भाग भांडवल प्रमाण 70.07 टक्क्यांपर्यंत खाली येईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.