
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच झि-टेक इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 29 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ( झि-टेक इंडिया कंपनी )
झि-टेक इंडिया कंपनी आपल्या IPO द्वारे 33.91 लाख फ्रेश शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. झि-टेक इंडिया कंपनीच्या IPO चा आकार 37.30 कोटी रुपये आहे.
झि-टेक इंडिया कंपनीने आपल्या IPO स्टॉकची प्राइस बँड 104 रुपये ते 110 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. झि-टेक इंडिया कंपनीचा IPO 31 मे रोजी बंद होईल. 3 जून रोजी IPO शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. आणि 4 जून रोजी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या कंपनीने आपल्या आयपीओमध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदाराला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 132000 रुपये जमा करावे लागतील.
IPO नंतर झि-टेक इंडिया कंपनीतील प्रवर्तकांची शेअर होल्डिंग 82.65 टक्क्यावरून कमी होऊन 60.75 टक्क्यांवर येईल. झि-टेक इंडिया कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 65 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. अशा परिस्थितीत हा स्टॉक 175 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 59 टक्के नफा मिळू शकतो. आज 28 मे रोजी हा IPO अँकर गुतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. ही कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून 10.63 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
झि-टेक इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. आणि QIB साठी 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात झि-टेक इंडिया कंपनीने 7.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 1.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.