14 December 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरने 6 दिवसात 25 टक्के परतावा दिला, जाहीर टार्गेट प्राईसच्या पार, पुढे किती तेजी?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.17 टक्के वाढीसह 38.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 6 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 265 टक्के वाढली आहे. मागील 4 वर्षांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. 2005 मध्ये या कंपनीचे शेअर 500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2019 पर्यंत सुझलॉन एनर्जी स्टॉक 2 रुपये किमतीवर आला होता.

नुवामा रिसर्च फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, स्टॉकमधील जबरदस्त तेजीमुळे सुझलॉन एनर्जी स्टॉक एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सवर सूचीबद्ध होण्यास पात्र बनला आहे. जर सुझलॉन एनर्जी स्टॉक या इंडेक्सवर सूचीबद्ध झाला तर, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकमध्ये 190 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते.

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने सुझलॉन एनर्जी स्टॉकची लक्ष्य किंमत 37 रुपये निश्चित केली होती आणि आता ती देखील शेअरने पार केली आहे. सुझलॉन कंपनीचे शेअर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स RSI सध्या 80 अंकावर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा स्टॉक आता ओव्हरबॉट झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x