
IPO Investment| Kaynes Technology इंडिया कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी या Kaynes Technology कंपनीचा IPO 1.10 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. Kaynes Technology कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 559-587 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. IPO ला ग्रे मार्केटमध्ये मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून शेअर प्रिमियम किमतीवर लिस्ट होऊ शकतात असा अंदाज व्यक्त येत आहे. ग्रे मार्केटमध्ये Kaynes Technology कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत 115 रुपयांपर्यंत गेली आहे.
शेअर्सगची ग्रे मार्केटमधील किंमत :
ग्रे मार्केटमधील स्टॉक वॉचर्सनी या IPO चे निरीक्षण करताना म्हंटले आहे की, Kaynes Technology कंपनीचे शेअर ग्रे मार्केटमध्ये सध्या 115 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. Kaynes Technology कंपनीच्या IPO शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत गेल्या आठवड्यातील किमतीच्या तुलनेत 40 रुपयांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यातील ट्रेडिंग सेशनमध्ये Kaynes Technology कंपनीचा शेअर ग्रे मार्केट प्रीमियम 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे शेअर्स 22 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाणार आहे.
IPO चा तपशील थोडक्यात :
Kaynes Technology ने आपला IPO खुल्या बाजारात आणण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 257 कोटी रुपये जमा केले होते. Kaynes Technology कंपनीच्या IPO मध्ये 530 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करण्यात येणार आहे, सोबत कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान शेअर धारक 55.85 लाख इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. Kaynes Technology कंपनी या IPO मधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनोवरील कर्ज फेडण्यासाठी, त्याच्या उत्पादन प्रकल्पांच्या भांडवली खर्चासाठी आणि कार्यरत भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी खर्च करणार आहे. Kaynes Technology या कंपनीने स्वतःच्या Kaynes इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.